भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र आयोजित नंदुरबार, धुळे व पालघर जिल्ह्यातील निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य यांचा दोन दिवसीय प्रशिक्षण वर्ग बाबा रिसॉर्ट नंदुरबार येथे घेण्यात आला.
याप्रसंगी नंदुरबार धुळे व पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती व जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.
या प्रशिक्षण वर्गाला आदिवासी विकास मंत्री माननीय श्री. विजयकुमार गावित साहेब, आमदार श्री.जयकुमार भाऊ रावल, जळगावचे खासदार श्री. उन्मेषदादा पाटील,भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष श्री. सुनील कर्जतकर ,भाजपा प्रदेश महामंत्री श्री.विजय चौधरी, आमदार श्री.राजेश पाडवी,धुळे जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.अश्विनी पाटील, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, लोकसभा प्रभारी तुषार रंधे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावित तसेच अन्य मान्यवरही उपस्थित होते.