जाहीर निषेध……!
जालना अंतरवाली सराटी या गावात १ सप्टेंबर २०२३ रोजी मराठा आरक्षणासाठी शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठ्यांवर अमानुष लाठीहल्ला गोळीबार करणाऱ्या शिंदे-फडणवीस-अजित पवार या मग्रूर सरकारचा व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आज शनिवार दिनांक:-९ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजता मालाड पश्चिम रेल्वे स्थानकाच्या समोर सकल मराठा समाज मालाड पूर्व-पश्चिम ह्या विभागातर्फे आंदोलन करण्यात आले आहे.
||एक मराठा लाख मराठा||
मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही म्हणजे नाहीच! मराठा झंझावात…………..
मराठा क्रांती मोर्चा मुंबई.